तोरणा किल्ल्याचे वर्णन

तोरणा  ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची १४०० फुट आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येतो.  तोरणा किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो पुणे डोंगररांगे  मध्ये येतो आणि त्याची श्रेणी मध्यम आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात अनेक किल्ले घेतले त्यापैकी हा एक किल्ला. गडावरती तोरण जातीची पुष्कळ झाडे होती तसेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे  पडले. शिवाजी महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगडअसे ठेवले.  
 पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेचे दोन पदर निघून पूर्वेस पसरले आहे. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड आहे टीआर दुसर्‍या पदराला भुलेश्वर रंग म्हणतात.  तोरणा गडाच्या पश्चिमेला कानद खिंड आणि पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.



इतिहास : तोरणा हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पूर्वा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून  हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. नंतर हा किल्ला निजामशाहीत गेला . नंतर तो महाराजांनी घेतला व त्याचे नाव प्रचंडगड ठेवले. तोरणा किल्ल्या वरती काही इमारती बांधल्या. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्‍यावरुन आल्यावर अनेक किल्ल्यांचा जीर्णोध्दार केला. त्यात ५ हजार होण इतका खर्च त्यांनी तोरणा किल्ल्यावर केला. छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो किल्ला परत मराठ्यांच्या ताब्यात घेतला. पुढे इ. स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात घेतला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षानी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात घेतला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडे रहिला . विशेष म्हणजे औरंगजेब बादशाहाने  लढाई करून जिंकलेला असा  हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.


राहण्याची सोय : गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय आहे.

पाण्याची सोय: मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे.

PDF File Download


Comments

Popular posts from this blog

मांगी-तुंगी किल्ला MANGI-TUNGI FORT IN NASHIK

छत्रपती शिवाजी महाराजांची काही खरी चित्रे .