हरगड Hargad

हरगड ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची ४४५० फुट आहे . हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये येतो . हरगड किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो बागलाण डोंगररांगे मध्ये येतो आणि त्याची श्रेणी मध्यम आहे . इतिहास इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही . मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते . समोर दिसणारा मुल्हेर , डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड . या गडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त आहे . गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे गडमाथा तसा विस्तीर्ण आहे . गडमाथा म्हणजे एक पठारच होय . या पठारावर काही तटबंदीचे अवशेष आहेत . पाण्याची दोन टाकी आहेत . एक पडके मंदिर आहे . वाड्यांचे काही अवशेष आढळतात . पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पिण्यासारखे नाही . गडफेरी मारताना पुढे सपाटीवर एक गुहा आढळते यात कपार भवानीचे मंदिर आहे . गडावर जाण्याच्या वाटा गडावर जाणारी वाट ...