हरगड Hargad


हरगड  ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची ४४५० फुट आहे हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये येतो हरगड  किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो बागलाण डोंगररांगे मध्ये येतो आणि त्याची श्रेणी मध्यम आहे.
इतिहास
इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही. मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते. समोर दिसणारा मुल्हेर,डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड. या गडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
गडमाथा तसा विस्तीर्ण आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. या पठारावर काही तटबंदीचे अवशेष आहेत. पाण्याची दोन टाकी आहेत. एक पडके मंदिर आहे. वाड्यांचे काही अवशेष आढळतात. पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पिण्यासारखे नाही. गडफेरी मारताना पुढे सपाटीवर एक गुहा आढळते यात कपार भवानीचे मंदिर आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाणारी वाट मुल्हेर गावातून जाते. मुल्हेर गावातून पुढे आल्यावर एक डांबरी रस्ता लागतो. या रस्त्याने वीस मिनिटे पुढे गेल्यावर दोन फाटे फुटतात. एक डावीकडे जातो, तर दुसरा वडाच्या झाडापासून पुढे जातो. ही वाट छोटाश्या टेकडीवर असणाऱ्या धनगर वाडीपाशी पोहोचते. ेथून उजवीकडे वळावे आणि थेट मुल्हेर व हरगड यांमधील खिंड गाठावी. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास पुरतो. खिंडीत डावीकडे जाणारी वाट आपल्याला मुल्हेरगडाकडे तर उजवीकडे जाणारी वाट हरगडाकडे घेऊन जाते. वाट फारशी मळलेली नसल्यामुळे अस्पष्ट झालेली आहे. या खिंडीपासून गडमाथा गाठण्यास एक तास लागतो.
राहाण्याची सोय: किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय: किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: मुल्हेरवाडी गावातून हरगडावर जाण्यास ३ तास लागतात.

Comments

Popular posts from this blog

मांगी-तुंगी किल्ला MANGI-TUNGI FORT IN NASHIK

चांभारगड किल्‍ला CHAMBHARGAD FORT IN RAIGAD

छत्रपती शिवाजी महाराजांची काही खरी चित्रे .