छत्रपती शिवाजी महाराजांची काही खरी चित्रे .


छत्रपती शिवाजी महाराजांची काही खरी चित्रे .

            नमस्कार मित्रांनो / मैत्रिणींनो  माझ नाव ओंकार आज मी तुम्हाला छत्रपती शिवजी महाराज्यांचे काही जूनही चित्रे दाखवणार आहे . छत्रपती शिवाजी महाराजांची खूप  चित्रे  उपलब्ध आहे , परंतु ती चित्रे परदेशांमध्ये आहे. बऱ्याच चित्रांवर तारीख नसलयामूळे  तत्कालीन संग्रह करणार्याने नोटीसवर लिहिलेली तारीख अवलंबून आहे
            मनुची संग्रहाचे दोन चित्र  आणि किशनगड चे चित्र सोडता  बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाही. आजवर उपलब्ध असलेल्या शिवरायांचे  सर्व छाया चित्र .

 मनुची चित्र संग्रह- मीर महम्मद १६७२ च्या आसपास , हे चित्र काढले आहे . मनुचीने भारतातील ५६ राजे बादशहा ह्यांची चित्रे काढले आहे .




. किशनगड चित्रशाळा हे चित्र चित्रकार निहाल चांद ने १७५० च्या नंतरकाढले आहे . आणि हे चित्र किशनगड मध्ये तयार केले आहे . सध्या हे चित्र  बॉनहॅम्स कलेक्शन लंडन यथे आहे .


.राजपूत शैली हे चित्र जगजितसिं  गायकवाड ह्यांच्या कडून हे प्राप्त झाले. राजपूती  शैलीतील  हे चित्र राजस्थान मध्ये काढले गेले असून हे चित्र  १७५० च्या नंतरचे आहे .


. रॉबर्ट ऑर्म कलेक्शन - १७८२ सालच्या हिस्टोरीकल फ्रॅंगमेंट्स या ऑर्मच्या पुस्तकात मधले हे चित्र आहे , हे चित्र १७८२ च्या आधीचे आहे .


. अश्र्वारूढ शिवराय – झेनेटीने हे चित्र मनुची साठी काढले असण्याची शक्यता आहे. मूळ चित्र कॉपर एनग्रेव्हड असून त्यावरती रंगकाम केले आहे. १७८५ ,  १८२१, १८३१ च्या युनिव्हर्स पिक्चरस्क आणि इंडे या ग्रंथात हे चित्र आले आहे. हे चित्र अँटोन झेनेटी ने काढले आहेचित्राचा साधारण काळ १७०५-१७४१  असावा. झेनेटीने हे चित्र मनुचीसाठी काढले असण्याची शक्यता आहे


.मुंबईतील चित्र– १६७५ नंतर गोवळकोंडा येथे हे चित्र काढले असावे.  छत्रपती शिवाजी वस्तूसंग्रहालय ,मुंबई येथे सध्या हे चित्र आहे. हे प्रसिद्ध चित्र टाटा कलेक्शन मधीलआहे.


.फ्रांस राष्ट्रीय ग्रंथालयसध्या हे चित्र फ्रांसमध्येआहे. वृद्धावस्थेकडे झुकलेले छत्रपती शिवाजी महाराज्यांचे हे  चित्र सन १६८५ मधले गोवळकोंडा येथील आहे .


८.स्मिथ लेसोफ कलेक्सन- छत्रपती शिवाजी महाराजांचे हे उभे चित्र  १७ व्या शतकाच्या शेवटचे असावे.एका हातामध्ये तलवार, दुसर्‍या हाता मध्ये पट्टा असलेले हे चित्र फ्रांस च्या राष्ट्रीय ग्रंथालयात आहे. 


९.रिक्स म्युसियम- छत्रपती शिवाजी महाराजांचे हे उभे चित्र  १६८०  च्या आसपासचे  असल्याची नोंद आहे .हे चित्र हॉलंड मधील असून ह्या चित्रा वर ‘Siesvage’ लिहिलेले आहे. डाव्या हातात पठ्ठा , उजव्या हातात तलवार आहे.

१०. विटसेन संग्रह– हे चित्र १६७५-१६८५ च्या काळा मधले  आहे .हे चित्र हॉलंड मधील रिक्स म्युझियम येथे आहे .ह्या चित्रावर ‘Siwagli Prince in Dream’ असे लिहिले आहे.


११.बर्लिन , जर्मनी– बर्लिन स्टेट लायब्ररी येथे  असणारे हे चित्र आहे ,या चित्रावर ‘Siuwagie gewerzere maratise vorst’ असे लिहिले  आहे. Siuwagie gewerzere maratise vorst’ च अर्थ मराठ्यांचा राजा असा होता .हे चित्रा 1700 च्या पूर्वीचे असून, तत्कालीन भारतातून हॉलंड नंतर तेथून जर्मनी येथे नेले आहे.


१२. गिमे म्युझियम– पॅरिस फ्रांस येथील मुघल शैलीतील हे शिवरायांचे  चित्र आहे.  चित्राचे वैशिष्टय म्हणजे ह्या चित्रात त्यांचा पूर्ण चेहरा दिसत आहे.


१३ .ब्रिटिश म्युसियम– लंडन येथे सध्या असणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रा पोर्टरेट्स ऑफ इंडियन प्रिन्सेस या अल्बम मधील आहे. हे चित्रा गोवळकोंडा येथे तयार केलेले असून काळ १६८० ते १६८७ नोंदवला आहे.


१४. फ्रांस्वा  वॅलेंटिन संग्रह– हे चित्र १७८२ मध्ये प्रसिद्ध झाले असून ते 1712 च्या आधीचे असावे. चित्रावर 'dwn hee Seva Gi' लिहिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भिंती वर हात ठेवलेले वैशिष्टपूर्ण हे चित्र फ्रांस्वा  वॅलेंटिन ह्या डच अधिकाराच्या संग्रहातील आहे.


१५लेनिनग्राड हे चित्र इंडियन मिनीचर्स  या चित्र संग्रहातून प्रशिद्ध झाले असून हे चित्रा बर्लिन मधल्या चित्राशी मिळतेजुळते आहे. हे चित्र  हॉलंड मधून प्राप्त झाले असून सध्या रशियन च्या लायब्ररी मध्ये आहे.
(सर्व चित्रे शिवकालीन व शिवोत्तरकालीन आहे,ई.स .१८०० नंतरची चित्र विचारात घेतली नाहीत.)


फोटो व माहिती- मालोजीराव जगदाळे

PFD File Download

Comments

Popular posts from this blog

मांगी-तुंगी किल्ला MANGI-TUNGI FORT IN NASHIK

चांभारगड किल्‍ला CHAMBHARGAD FORT IN RAIGAD