शिवा काशीद या मावळ्याचे बलिदान


शिवा काशीद


शिवा काशिद यांचा जन्म पन्हाळ्या किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्‍या नेबापुर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. शिवा काशीद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यांच्या सैन्यात न्हावी होते. अफजलखानाच्या वधानंतर आदिलशाहने सिध्दी जोहरला छत्रपती शिवाजी राजेंविरुध्द धाडले. दिनांक २ मार्च १६६० साली, सुमारे २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळ घेऊन सिध्दी छत्रपती शिवरायांवर चालून आला. त्यावेळी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते. सिध्दीने पन्हाळा किल्ल्यास वेडा घातला होता. स्वराज्यावर मोठे संकट आले होते. पावसळ्याचे दिवस होते पन्हाळ्या किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते, कारण महाराजांना शाहिस्तेखानाचा बंदोबस्त कारचा होता.


    
       छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरडस मावळतील शूर अशा बांदलाचा सहाशे जणांचा जमाव निवडला. पालखीसाठी भोई सुध्दा खास निवडले. सिध्दीस तहाचा समझोता धाडून राजेंनी त्यास गाफिल ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज्यांसारख्या दिसणार्‍या शिवा काशिदला राजेंनी पालखीत बसवून मलकापुरच्या दिशेने पाठवले, तर छत्रपती शिवाजी महाराज्यांची पालखी म्हसाई पठारच्या दिशेने गेली. मुसळदार पावसाचा फायदा घेत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन निसटले आणि विशाळगडावर पोहचले. सिध्दी जोहरला याचा थांगपत्ता लागला त्याने पाठलाग करून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी पकडली. शिवाजीराजे आपल्या ताब्यात आल्यामुळे सिध्दी खुशीत होता पण लवकरच त्याला कळून चुकले की आपण शिवा कशिद नावच्या मावळयाला पकडले आहे.
      सिध्दीने त्यास विचारले की तुला मरणाचे भय वाटत नाही का ? त्यावर शिवा काशिद म्हणाला की छत्रपती शिवाजी राजेंसाठी मी हजार वेळा मरायला तयार आहे. छत्रपती शिवाजी राजे कोणास सापडणार नाहीत. हे उत्तर ऐकून रागाने सिध्दीने शिवा काशिद यास ठार केले. इतिहास ही त्याचा पराक्रम विसरू शकणार नाही. शिवा काशिद ह्यांची समाधी पन्हाळ्या किल्ल्या वर आहे॰

PDF File Download

Comments

Popular posts from this blog

मांगी-तुंगी किल्ला MANGI-TUNGI FORT IN NASHIK

तोरणा किल्ल्याचे वर्णन

छत्रपती शिवाजी महाराजांची काही खरी चित्रे .