ताहुली Tahuli Fort
ताहुली ह्या
किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची ३४८७ फुट आहे. हा किल्ला ठाणे
जिल्ह्यामध्ये येतो. ताहुली किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो माथेरान
डोंगररांगे मध्ये येतो आणि त्याची श्रेणी
मध्यम आहे. कल्याण, कर्जत आणि पनवेल या विभागात ताहुली किल्ला आहे.
ताहुलीला किल्ला किंवा गड म्हणणे तसे अयोग्यच. हा त्याच्या तीन सुळक्यांमुळे
प्रसिद्ध आहे॰ उंच बेलागकडे, जाण्याच्या अवघड वाटा यामुळे ताहुली
वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि कदाचित यामुळेच दुर्लक्षितही आहे.
गडावरील
पहाण्यासारखी ठिकाणे
ताहुलीच्या पठारावर
संत गाडगेबाबा महाराजांचा मठ आहे. आणि या वाटेत आणखी दोन आश्रम लागतात. पठाराच्या
सर्वात वरच्या भागाला ‘दादीमा ताहुली’ म्हणतात. येथे ५ पीर
आहेत आणि याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तासात आपण
ताहुलीच्या सुळक्यापाशी पोहोचतो. एका सुळक्याचे नाव ‘दाऊद’ तर
दुसऱ्याचे नाव ‘बामण’ आहे.
गडावर जाण्याच्या
वाटा
ताहुलीवर जाण्यासाठी
दोन मार्ग आहेत. अंबरनाथ वरून जाते आणि दुसरी कुशीवली वरून
१. अंबरनाथ वरून बाहेर पडल्यास बदलापुरचा रस्ता ओलांडावा आणि काही वेळात काकुली नावाचा तलाव लागतो. आणि या तलावापासून थोड्या अंतरावर एक
डोंगराची सोंड वर ताहुलीच्या तीन सुळक्यांपाशी पोहोचते. या वाटेने ताहुली पठारावर पोहचायला
कमीत कमी ४ तास लागतात.
२. कुशीवली वरून कल्याण मलंगगड रोडवर कुशीवली गावाच्या स्टॉपवर उतरणे. आणि गावाच्या
बाहेरूनच थेट बैलगाडी जाईल एवढी मोठी वाट ताहुलीला गेली आहे. ही वाट दोन
डोंगराच्या बेचक्यातून वर जाते. कुशीवली गावापासून वर पठारावर जाण्यासाठी अडीच
तास लागतात.
गडावर राहण्याची सोय
नाही.
जेवणाची सोय नाही,
आपणच सोय करावी लागते.
पाण्याची सोय नाही.
Comments
Post a Comment