Posts

Showing posts from May, 2020

हरगड Hargad

Image
हरगड    ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची ४४५० फुट आहे .    हा किल्ला   नाशिक   जिल्ह्यामध्ये येतो .  हरगड    किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो   बागलाण डोंगररांगे   मध्ये येतो आणि त्याची श्रेणी   मध्यम   आहे . इतिहास इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही . मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते . समोर दिसणारा   मुल्हेर , डावीकडे   मोरागड   आणि उजवीकडचा हरगड . या गडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त आहे . गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे गडमाथा तसा विस्तीर्ण आहे . गडमाथा म्हणजे एक पठारच होय . या पठारावर काही तटबंदीचे अवशेष आहेत . पाण्याची दोन टाकी आहेत . एक पडके मंदिर आहे . वाड्यांचे काही अवशेष आढळतात . पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पिण्यासारखे नाही . गडफेरी मारताना पुढे सपाटीवर एक गुहा आढळते यात कपार भवानीचे मंदिर आहे . गडावर जाण्याच्या वाटा गडावर जाणारी वाट  ...

सुमारगड

Image
सुमारगड ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची   २० ००   फुट आहे .    हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो . सुमारगड किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो महाबळेश्वर कोयना डोंगररांगे    मध्ये येतो आणि त्याची श्रेणी कठीण आ हे.                 सुमारगड हा नावाप्रमाणेच " सुमार " आहे . ‘ उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं . ‘ असा गोनीदांनी या किल्ल्याबद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे . रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो . आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे . गडावरील पाहण्यासाठी ठिकाणे : किल्ल्यावर वर पोहोचल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत . टाक्यांच्या पोटातच एक गुहा आहे . यात शिवाची पिंड आणि देवीची मूर्ती आहे . पाण्याच्या टाक्यांच्या उजव्या अंगास थोडे वर गेल्यावर एकखांबी पाण्याचे टाके लागते . एक वाट समोरच्या टेकाडावर जाते तर , दुसरी टेकाडाला वळसा घालून पुन्हा टाक्यांपाश...

मदनगड

Image
मदनगड ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची   ४ ९ ००   फुट आहे .    हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये येतो .   मदनगड किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो कळसूबाई डोंगररांगे    मध्ये येतो आणि त्याची श्रेणी खूप कठीण आहे सह्याद्रि मधील अत्यंत कठीण अशागाडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड   होय. हा किल्ला तसा बराच प्राचीन आहे आणि तेवढाच दुर्गम सुद्धा आहे. या परिसरातील भटकंती करायची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिने. अलंग , मदन , कुलंग या तीनही किल्ल्यांचा ट्रेक एकत्र केला जातो. गडावर पहाण्याची ठिकाणे : गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसतो. मदनगडावरून अलंग , कुलंग , छोटा कुलंग , रतनगड , आजोबा गड , कात्राबाई , डांग्या सुळका , हरिहर , त्रिबंकगड हे किल्ले दिसतात. गडफेरीस अर्धातास लागतो. गडावर पोहोचण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अ...

मांगी-तुंगी किल्ला MANGI-TUNGI FORT IN NASHIK

Image
मांगी - तुंगी ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची ४००० फुट आहे .   हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये येतो . मांगी - तुंगी किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो सेलबारी - डोलबारी डोंगररांगे   मध्ये येतो आणि त्याची श्रेणी सोपी आहे . बागलाण सुपीक , सधन आणि संपन्न असा मुलूख आहे. सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण डोंगररांगेची सुरुवात होते , ती या बागुलगेड (बागलाण) विभागातूनच होते. येथे असणार्‍या दुहेरी पूर्व-पश्चिम रांगेला सेलबारी-डोलबारी असे संबोधण्यात येते. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके , न्हावीगड आहे. मांगी तुंगी ही जैन लेणी आहेत. परंतू बागलाण मधील किल्ल्यांची भटकंती मांगी तुंगी या सुळक्यांना भेट दिल्या शिवाय पूर्ण होत नाही. मांगीतुंगी ही जैन लोकांची तीर्थक्षेत्रे आहेत. इतिहास बागलाणच्या बागुलवंशीय राठोड घराण्याचा ११ वा राजा विरमशहा राठोड याने मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली. गडावरील पहाण्याची ठिकाणे मांगी सुळक्याच्या पोटातील गुहांमधे महावीर , पार्श्वनाथ , आदिनाथ आणि इतर तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. यातील वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती म्हणजे बलभद्राची मुर्ती. बलभद्र...