काळदुर्ग किल्ल्याची माहिती Kaldurg Fort in Palghar


     काळदुर्ग  ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची १५०० फुट आहे. हा किल्ला ठाणे  जिल्ह्यामध्ये येतो.  काळदुर्ग किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो पालघर डोंगररांगे  मध्ये येतो आणि त्याची श्रेणी मध्यम आहे. 
ठाणे जिल्ह्यातील पालघर विभागात अनेक डोंगरी किल्ले आहेत. शहरी भागापासून जास्त लांब नसल्यामुळे ठाणे आणि मुंबईकरांना एका दिवसात आरामात बगता येतात. जंगल खूप असल्यामुळे इथे आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात अहे. आजही सारा परिसर मागासलेल्या अवस्थेत आहे. खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाहीकारण हा गड असल्याची कोणतीही खूण यावरती नाही. हे एक टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते. हे एक टेलेळनीचे ठिकाण असावे. , गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच होयया कातळामुळे हा गड लांबूनही दिसण्यात येतो. काळदुर्ग  गडाचे क्षेत्रफळ साधारण अर्धा एकर असावे. गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते.





काळदुर्ग हा किल्ला दोन थरांत विभागला आहे.
.गडमाथा आणि .खालचे पठार
पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास काही पायर्‍या आहे. किल्यावरुण संपूर्ण घाटमाथ्यावर नजर ठेवता येते.
राहण्याची सोय: गडावर निवारा असा नाही .
पाण्याची सोय: बारमाही पाण्याची सोय आहे
जेवणाची सोय: गडावर खायला काही नाही त्यामुळे त्याची सोय आपणच करावी.
जाण्यासाठी लागणारा वेळ:  वाघोबा खिंडीतून दोन तास



PDF File Download

Comments

Popular posts from this blog

मांगी-तुंगी किल्ला MANGI-TUNGI FORT IN NASHIK

मदनगड

तोरणा किल्ल्याचे वर्णन