चांभारगड किल्‍ला CHAMBHARGAD FORT IN RAIGAD


चांभारगड ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची १२०० फुट आहे. हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये येतो. चांभारगड किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो रायगड डोंगररांगे मध्ये येतो आणि त्याची श्रेणी मध्यम आहे.
रायगडाच्या आजूबाजूला असणार्‍या डोंगररांगावर अनेक किल्ले आहेत. यांत प्रामुख्याने लिंगाणा, काळदुर्ग,  सोगड व चांभारगड यांचा समावेश होतो. चांभारगडाचा उपयोग केवळ घाटमाथ्यावर नजर ठेवण्यासाठी व टेहेळणीसाठी होत असावा. चांभारगड हा महाडपासून हाकेच्या अंतरावर आहे.



गडावरील पाहण्यासाठी ठिकाणे
गडमाथा म्हणजे एक छोटेसे पठारच आहे. पठारावर थोडेफार घरांचे अवशेष आहेत तर पठाराच्या खालच्या डोंगराच्या पट्टीवर पाण्याची एक दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या बांधणीवरुन हा गड फार पुरातन असावा असा अंदाज बांधता येतो. याखेरीज गडावर पाहण्याजोगे काहीच नाही. अर्ध्या तासात संपूर्ण गड फिरून होतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
प्रथम गडावर जाण्यासाठी महाड गाठावे. महाडा-पोलादपूर हायवे ओलांडून पायथ्याच्या चांभारखेड गावात पोहोवावे. महाड एस.टी. स्थानकापासून येथे जाण्यास २० मिनिटे लागतात. या खिंडीतुन पाऊण तासाच्या चालीनंतर आपण माथ्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. कातळकडा डावीकडे ठेवून थोडे पुढे जावे. नंतर वर जाणाई वाट पकडून १५ मिनिटांत गडमाथा गाठता येतो.
राहाण्याची सोय: गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय: किल्ल्यावर हॉटेल्स, खानावळ नसल्याने जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते
पाण्याची सोय: किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने पाण्याचीही सोय स्वतःलाच करावी लागते.
जाण्यासाठी लागणारा वेळ: महाड गावातून एक तास

PDF File Download

Comments

Popular posts from this blog

मांगी-तुंगी किल्ला MANGI-TUNGI FORT IN NASHIK

छत्रपती शिवाजी महाराजांची काही खरी चित्रे .