Posts

Showing posts from April, 2020

ताहुली Tahuli Fort

Image
      ताहुली ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची ३४८७ फुट आहे. हा किल्ला ठाणे जिल्ह्यामध्ये येतो . ताहुली किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो माथेरान डोंगररांगे   मध्ये येतो आणि त्याची श्रेणी मध्यम आहे. कल्याण ,   कर्जत आणि पनवेल या विभागात ताहुली किल्ला आहे. ताहुलीला किल्ला किंवा गड म्हणणे तसे अयोग्यच. हा त्याच्या तीन सुळक्यांमुळे प्रसिद्ध आहे॰ उंच बेलागकडे , जाण्याच्या अवघड वाटा यामुळे ताहुली वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि कदाचित यामुळेच दुर्लक्षितही आहे. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे       ताहुलीच्या पठारावर संत गाडगेबाबा महाराजांचा मठ आहे. आणि या वाटेत आणखी दोन आश्रम लागतात. पठाराच्या सर्वात वरच्या भागाला ‘ दादीमा ताहुली ’   म्हणतात. येथे ५ पीर आहेत आणि याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तासात आपण ताहुलीच्या सुळक्यापाशी पोहोचतो. एका सुळक्याचे नाव ‘ दाऊद ’   तर दुसऱ्याचे नाव ‘ बामण ’ आहे. गडावर जाण्याच्या वाटा ताहुलीवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. अंबरनाथ वरून जाते आणि दुसरी कुशीवली वरून...

जीवधन किल्ल्याचे वर्णन

Image
             जीवधन  ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची ३७५४फुट आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येतो . जीवधन किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो नाणेघाट डोंगररांगे  मध्ये येतो आणि त्याची श्रेणी कठीण आहे . घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ‘ जीवधन ’ किल्ला आहे. प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षनासाठी उभा केला होता. जीवधन किल्ला नाणेघाटापासून थोडयाच अंतरावर आहे. इतिहास:                शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती. आणि ह्याची साक्ष देणारा एकमेव किल्ला म्हणजे जीवधन. १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली . शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज ‘ मूर्तिजा निजाम ’ याला जीवधन या किल्ल्यावर कैदेत असताना त्याला सोडवून संगमनेरजवळ असणार्‍या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. आणि त्याला निजामशहा म्हणून घोषित केले. घाटघर हे जीवधनच्या पायथ्याचे गाव. घाटघर गावातील जमिनीचे वैशिष्ट्या महंजे बांबूची बने. सारे जंगल हे बांबूच्या बनांचे आहे. गोरक्षगडप्रमाणे या गडांचा दरव...

शिवा काशीद या मावळ्याचे बलिदान

Image
शिवा काशीद शिवा काशिद यांचा जन्म पन्हाळ्या किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्‍या नेबापुर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. शिवा काशीद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यांच्या सैन्यात न्हावी होते. अफजलखानाच्या वधानंतर आदिलशाहने सिध्दी जोहरला छत्रपती शिवाजी राजेंविरुध्द धाडले. दिनांक २ मार्च १६६० साली , सुमारे २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळ घेऊन सिध्दी छत्रपती शिवरायांवर चालून आला. त्यावेळी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते. सिध्दीने पन्हाळा किल्ल्यास वेडा घातला होता. स्वराज्यावर मोठे संकट आले होते. पावसळ्याचे दिवस होते पन्हाळ्या किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते , कारण महाराजांना शाहिस्तेखानाचा बंदोबस्त कारचा होता.              छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरडस मावळतील शूर अशा बांदलाचा सहाशे जणांचा जमाव निवडला. पालखीसाठी भोई सुध्दा खास निवडले. सिध्दीस तहाचा समझोता धाडून राजेंनी त्यास गाफिल ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज्यांसारख्या दिसणार्‍या शिवा काशिदला राजेंनी पालखीत बसवून मलकापुरच्या दिशेने पाठवले , तर छत्रपती शिवाजी ...

तोरणा किल्ल्याचे वर्णन

Image
तोरणा  ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची १४०० फुट आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येतो .   तोरणा किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो पुणे डोंगररांगे  मध्ये येतो आणि त्याची श्रेणी मध्यम आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात अनेक किल्ले घेतले त्यापैकी हा एक किल्ला. गडावरती तोरण जातीची पुष्कळ झाडे होती तसेस  छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा   असे  पडले. शिवाजी  महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून  ' प्रचंडगड '  असे ठेवले .     पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेचे दोन पदर निघून पूर्वेस पसरले आहे. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड आहे टीआर दुसर्‍या पदराला भुलेश्वर रंग म्हणतात.  तोरणा गडाच्या पश्चिमेला कानद खिंड आणि पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. इतिहास  : तोरणा हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पूर्वा आज उपलब्ध नाही. ...

छत्रपती शिवाजी महाराजांची काही खरी चित्रे .

Image
छत्रपती शिवाजी महाराजांची काही खरी चित्रे .             नमस्कार मित्रांनो / मैत्रिणींनो   माझ नाव ओंकार आज मी तुम्हाला छत्रपती शिवजी महाराज्यांचे काही जूनही चित्रे दाखवणार आहे . छत्रपती शिवाजी महाराजांची खूप   चित्रे   उपलब्ध आहे , परंतु ती चित्रे परदेशांमध्ये आहे . बऱ्याच चित्रांवर तारीख नसलयामूळे   तत्कालीन संग्रह करणार्याने नोटीसवर लिहिलेली तारीख अवलंबून आहे .              मनुची संग्रहाचे दोन चित्र   आणि किशनगड चे चित्र सोडता   बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाही . आजवर उपलब्ध असलेल्या शिवरायांचे   सर्व छाया चित्र .   १ .  मनुची   चित्र   संग्रह -   मीर   महम्मद   १६७२   च्या   आसपास   ,   हे   चित्र   काढले   आहे  .  मनुचीने   भारतातील   ५६   राजे   बादशहा   ह्यांची   चित्रे ...